Accident : मुंबई- बेंगलोर हायवेवर शिवभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Accident

Accident : मुंबई- बेंगलोर हायवेवर शिवभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात

राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई- बेंगलोर हायवेवर शिवभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ३५ जण जखमी झाले आहेत. (car accident on mumbai bangalore highway )

कात्रज देहूरोड बायपासच्या ताथवडे येथे एका टेम्पोचा अपघात झाला आहे. कंटेनरने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये अनेक शिवभक्त जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात ३० ते ३५ शिवभक्त जखमी झाले आहेत. तर १० जण गंभीर जखमी असून २० किरकोळ जखमी आहेत.

Vasant More : कुठे आहेत वसंत मोरे? इथे...; सभेमधला फोटो शेअर करत सूचक ट्वीट

मल्हारगड ते लोणावळा शिलाटणे येथे शिवज्योत घेऊन हे शिवभक्त निघाले होते. बेंगलोर मुंबई हायवेवर पोहचले असता टेम्पोला मागून कंटेनरची जोरात धडक बसली.

या अपघातामुळे मोठ्याप्रमाणात वाहतुक खोळंबली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

त्यापूर्वी, देहुनगरीतला तुकाराम बीज सोहळा संपन्न करुन त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा अपघात झाल्याची घटना समोर आली होती. अपघातात एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.

टॅग्स :accident case