व्यंग्यचित्रकारात जुलमी राजवट उलथविण्याची धमक- राज

व्यंग्यचित्रकारात जुलमी राजवट उलथविण्याची धमक- राज

मुंबई ः व्यंग्यचित्रकारात जुलमी राजवट उलथविण्याची धमक असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

जागतिक व्यंग्यचित्रकार दिनानिमित्त ट्‌विटरच्या माध्यमातून व्यंग्यचित्रकार सहकाऱ्यांना शुभेच्छा देतानाही राज यांनी कुंचल्याची ताकद काय असते ते दाखवून दिले आहे. व्यंग्यचित्रकाराच्या कुंचल्यात इतकी ताकद असते की एखादी जुलमी राजवट उलथवली जाऊ शकते, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून राजकीय फटकारे ओढले आहेत.
 


जागतिक व्यंग्यचित्रकार दिनानिमित्ताने व्यंग्यचित्रकार सहकाऱ्यांना शुभेच्छा तर आहेच, पण तुमच्या प्रतिभेची देशाला सगळ्यात जास्त गरज आहे, हे मात्र विसरू नका, असे राज यांनी ट्‌विट केले आहे. आपल्या कुंचल्यातून राज ठाकरे नियमितपणे राजकीय भाष्य करत असतात. त्यांनी या ट्‌विटसोबत व्यंग्यचित्र रेखाटतानाचा फोटोही पोस्ट केला आहे. तसेच देशाला तुमच्या प्रतिभेची आज सगळ्यात जास्त गरज आहे, असे व्यंग्यचित्रकारांना उद्देशून म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com