अजित पवार, मोहिते-पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते अडचणीत; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25000 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह 76 अन्य नेते अडचणीत आले आहेत. या प्रकरणात पाच दिवसात गुन्हा नोंदवा आणि तपास करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज (ता.26) आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25000 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह 76 अन्य नेते अडचणीत आले आहेत. या प्रकरणात पाच दिवसात गुन्हा नोंदवा आणि तपास करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज (ता.26) आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अजित पवारांसह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे आदींसह इतर बड्या नेत्यांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बड्या राजकीय नेत्यांनी नियमाचे उल्लंघन करून निधीचा गैरवापर केल्याची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. 

याचिका दाखल होऊनही गुन्हे न दाखल केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, शिखर बँकेच्या 46 संचालकांसह 34 जिल्हा बँकाच्या संचालकांचा यात समावेश आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case filed agains Ajit Pawar Mohite-Patil and other leaders