अविनाश भोसलेंच्या प्रकृती अस्वस्थतेवर सीबीआयला शंका; न्यायालयात केली मोठी मागणी... - Avinash Bhosale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Avinash Bhosale

Avinash Bhosale : अविनाश भोसलेंच्या प्रकृती अस्वस्थतेवर सीबीआयला शंका; न्यायालयात केली मोठी मागणी...

Avinash Bhosale :  येस बँक-डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील सुप्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले सीबीआय कोठडीत आहेत. अविनाश भोसले यांची ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) च्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आरोग्य तपासणी करण्यात आली होती. सीबीआयने मुंबईच्या विशेष न्यायालयात ही विनंती  केली होती.

अविनाश भोसले यांना सीबीआयने गेल्या वर्षी २६ मे रोजी अटक केली होती आणि नंतर त्यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात ताब्यात घेतले होते. ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून, ऑक्टोबरपासून रुग्णालयात दाखल आहेत. 

हेही वाचा: Shivananda Patil : पक्षाध्यक्षांनी विधानसभेसाठी जाहीर केली उमेदवारी, पण नशिबाने केला घात...

अविनाश भोसले यांची नवी दिल्लीतील एम्समधील वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर आता सीबीआयने शुक्रवारी भोसले यांच्या प्रकृतीवर शंका उपस्थित केली. भोसले यांची लष्करी किंवा नौदलाच्या रुग्णालयातून वैद्यकीय फेरतपासणी करावी का, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे का, याबाबत सवाल उपस्थित केला. 

हेही वाचा: Sharad Pawar : सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शरद पवार अन् एकनाथ शिंदे एकाच मंचावर; पुण्यातील...

अविनाश भोसले यांना २०२२ मध्ये  सीबीआय आणि ईडी या दोघांनी DHFL शी संबंधित एका प्रकरणात अटक केली होती. ऑक्टोबर २०२२ पासून अविनाश भासले नागरी संचालित सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. दरम्यान अविनाश भोसले यांच्या हॉस्पिटलमध्ये राहण्यावर सीबीआयने शंका उपस्थित केली आणि त्याच्या वैद्यकीय स्थितीची पडताळणी केली.

हेही वाचा: Britain Police : पोलिसांची थेट देशाच्या पंतप्रधानांवरच मोठी कारवाई; कारण जाणून तुम्हीही सावध व्हाल!

शुक्रवारी, सरकारी जे जे रुग्णालयाच्या डीनने मागील सुनावणीदरम्यान दिलेल्या निर्देशांनुसार न्यायालयात अहवाल सादर केला. भोसले यांची बुधवारी तपासनी झाली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये  दाखल करणे त्यांच्या हिताचे असेल, असे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा: Gurmeet Ram Rahim Singh : गुरमीत राम रहीमला पुन्हा ४० दिवसांची पॅरोल; आश्रमात...

टॅग्स :CBICBI inquiry