सीसीटीव्ही फुटेजची चाचपणी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 जुलै 2018

नाशिक/औरंगाबाद - नाशिकरोड कारागृहातील डॉ. बळिराम शिंदेचा मृत्यू व त्यातील सुदाम मुंडेच्या कथित सहभागाच्या वृत्तांमुळे राज्याचे कारागृह प्रशासन हादरले आहे. अप्पर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शनिवारी तातडीने औरंगाबादच्या हर्सूल कारागृहाची पाहणी केली. शिंदेच्या मृत्यूची वेळ, तसेच मुंडेला मिळणारी बडदास्त या बाबींशी संबंधित दोन्ही मध्यवर्ती कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजवर गृह खात्याने लक्ष केंद्रित केले आहे. 

या प्रकरणातील व्हीसल ब्लोअरने माहितीच्या अधिकाराखाली या आधीही सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ते फुटेज नष्ट केले असावे, असा संशय आहे. सातारा येथील सामाजिक कार्यकर्त्या व लेक लाडकी अभियानाच्या प्रमुख ॲड. वर्षा देशपांडे यांनीही त्या फुटेजच्या आधारे सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर, गृह खात्यात हे फुटेज तपासण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

कळ्यांचा मारेकरी तुरुंगातही मोकाट या शनिवारच्या सकाळमध्ये प्रकाशित वृत्तानंतर कारागृह प्रशासनात खळबळ उडाली, तर मृत्यूची मालिका व फितूर साक्षीदार या रविवारच्या वृत्ताने पोलिस यंत्रणा हादरली. डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शनिवारी दिवसभर औरंगाबाद येथील कारागृहामधील बराकींची पाहणी केली. नाशिक रोडवरून ५ मे २०१७ रोजी हलविण्यात आलेला सुदाम मुंडे सध्या त्याच कारागृहात आहे. विशेषत: कैद्यांना मोबाईल व अन्य सुविधा पुरविल्या जात आहेत का, याकडे डॉ. उपाध्याय यांचे लक्ष होते, असे सांगण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात ज्यांच्या भूमिकेची खूप चर्चा आहे, असे औरंगाबाद विभागाचे तुरुंग उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी मात्र यासंदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला. 

Web Title: CCTV footage checkup