एक्‍स्प्रेस वेवर असणार आता सीसीटीव्हीचा डोळा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

- वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर 

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणारी लेन कटिंग, वेग मर्यादेचे उल्लंघन आदी बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी 95 कि.मी.च्या या महामार्गावर प्रत्येक चार ते पाच कि.मी. अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर वाहतूक पोलिसांच्या विनंतीनुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा निर्णय घेतला आहे. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्ष लोणावळा परिसरात उभारण्यात असून, नियम मोडणाऱ्या चालकांकडून दंड वसूल केला जाणार आहे. 

एअर इंडिया'ला सुरक्षा यंत्रणेतून दरवर्षी 23 कोटींचे उत्पन्न

एक्‍स्प्रेस वेवरील वाहतूक अत्याधुनिक पद्धतीने नियंत्रित व्हावी, यादृष्टीने "एमएसआरडीसी'चे नियोजन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅमेरे बसवणे आणि त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आली आहे.

'एअर इंडिया'ला सुरक्षा यंत्रणेतून दरवर्षी 23 कोटींचे उत्पन्न

निविदांची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता दिलीप उकिरडे यांनी दिली. नियम मोडणाऱ्या चालकांच्या वाहनांचा क्रमांक लगेचच पुढील टोलनाक्‍यावरील नियंत्रण कक्षाला संदेशाद्वारे दिला जाईल. त्यानुसार संबंधितांकडून टोल नाक्‍यावरच दंड आकारला जाईल, अशा पद्धतीचे नियोजन नियंत्रण कक्षातून केले जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CCTV will set on Mumbai Pune Express way