Vidhan Sabha 2019 : 'राज्यात 24 ऑक्‍टोबरला दिवाळी साजरी करा'

Vidhan Sabha 2019 : 'राज्यात 24 ऑक्‍टोबरला दिवाळी साजरी करा'

कल्याण : कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते कलम 370 ला विरोध करून स्वतःच्या पायांवर कुऱ्हाड मारत आहेत. या लोकांनी दहशतवाद आणि नक्षलवादाला प्रोत्साहन देऊन आपली संपत्ती वाढविली आहे. गेली पाच वर्षे मोदी आणि योगी सरकारचे काम आपण पाहिले असून, देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी भाजप आणि मित्रपक्षांना मतदान करून अयोध्येअगोदर महाराष्ट्रात 24 ऑक्‍टोबरला दिवाळी साजरी करा, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कल्याण पूर्वमधील प्रचारसभेत केले. 

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या प्रचारार्थ आज विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकासमोरील मैदानावर आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. पाऊस सुरू असतानाही सभेला नागरिकांनी गर्दी केली होती. योगी आदित्यनाथ म्हणाले, ""पूर्वीचे कॉंग्रेस सरकार आणि आताचे मोदी सरकार यात काय फरक आहे हे आपण जाणत आहात. मी फक्त आवाहन करण्यास आलो आहे, की 26 ऑक्‍टोबरला अयोध्यामध्ये भव्य दीपोत्सव साजरा करत असून, त्यापूर्वी गणपत गायकवाड यांच्यासमवेत महाराष्ट्रातील भाजप आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांना विजयी करत 24 ऑक्‍टोबरलाच दीपोत्सव साजरा करा.'' 

देशात सध्या मोदी हेच उत्तम पर्याय असून देशांतर्गत फसवणूक व भ्रष्टाचार करणारे लोक तुरुंगात जात आहेत. कॉंग्रेसच्या काळात दररोज गैरव्यवहार होत होते. टु-जी,, कॉमनवेल्थ गेम्समध्ये 70 हजार कोटींचा गैरव्यवहार यांमुळे देशाची जगासमोर बदनामी झाली. मात्र आम्ही कुंभमेळ्याचे आयोजन केले आणि त्याच देशाचे नाव जगभरात नेले, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com