पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा : मुख्यमंत्री 

Celebrate Eco friendly Diwali says CM Devendra Fadnavis
Celebrate Eco friendly Diwali says CM Devendra Fadnavis

मुंबई : नागरिकांनी प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मंत्रालयात केले. 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागातर्फे आयोजित प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान शपथ कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ""गेल्या वर्षी कमी फटाके फुटले. मुंबईसह राज्याचे प्रदूषण कमी झाले होते. यामध्ये शालेय मुलांनी मोठा सहभाग घेतला होता. अलीकडे मुलांमध्ये पर्यावरणविषयक जागृती झाली आहे. यंदाही मुलांनी आणि पालकांनी कमी आवाजाचे फटाके वाजवून पर्यावरणपूरक, प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी.'' 

प्लॅस्टिक बंदीची मोहीम राज्यभर सुरू आहे. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. ध्वनिप्रदूषण, फटाके मुक्त दिवाळी आणि प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्र, अशा मोहिमा यशस्वीपणे राबविण्यासाठी पर्यावरण विभाग काम करीत आहे. या सर्व मोहिमेत पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com