सेलिब्रेटींचा 'मदर्स डे'

टीम ई सकाळ
रविवार, 14 मे 2017

मदर्स डे हे निमीत्त आहे आईविषयी व्यक्त होण्याचं, बोलण्याचं, लिहिण्याचं, शेअर करण्याचं हे निमित्त आहे. आपण एखाद्याला फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर  'फॉलो' करतो त्याचप्रमाणे आईची कोणती गोष्ट फॉलो करतो हे सांगून सेलिब्रेटींनी आजचा दिवस साजरा केला.

मदर्स डे निमित्त स्पृहा जोशी सांगते की आईला आपण खूप गृहित धरतो.. आईला फॉलो करण्याचा ती मनापासून प्रयत्न करत असल्याचेही तिने सांगितले आहे 

 

गायिका, निर्माती नेहा राजपाल अगदी आजही आईची मदत घेते. माझी आईच माझी फॅशन डिझाईनर आहे असे ती अभिमानाने सांगते.

पुर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

अभिनेता मंगेश देसाई सांगतो की आई हे जगातील सर्वश्रेष्ठ नातं आहे असं तो समजतो.  माझी आई खूुप सहनशील, प्रेमळ, कोणाचं मन नं दुखावणारी आहे असेही तो सांगतो.

 

वैभव मांगलेचं वाचन वेड अफाट आहे. ते त्याच्यात रुजवलं, त्याच्या आईने.. लोकांसोबत कसं वागावं तसेच कसं वागू नये हे आईने शिकवल्याचं तो सांगतो.

पुर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री मृण्मयी गोडबोले सांगत आहेत ते त्यांच्या आईची कोणती गोष्ट फॉलो करतात..

Web Title: celebritys's mothers day