सिंचनासाठी महाराष्ट्राला केंद्राकडून 1 लाख 15 हजार कोटी रुपयांची मदत

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जुलै 2018

राज्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी आणि रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राने 1 लाख 15 हजार कोटीं रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. यामुळे राज्याच्या सिंचन क्षमतेत 22 टक्क्यांनी वाढ होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई- राज्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी आणि रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राने 1 लाख 15 हजार कोटीं रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. यामुळे राज्याच्या सिंचन क्षमतेत 22 टक्क्यांनी वाढ होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गडकरी म्हणाले की, केंद्राची ही महत्वाकांक्षी योजना असून त्यामुळे राज्याची सिंचनासाठी मोठी मदत होणार आहे. राज्यातील सिंचन क्षमतेतही यामुळे वाढ होणार असून ती 18 टक्क्यांवरुन 40 टक्क्यांवर जाणार आहे.

हा पैसा राज्यभरातील एकूण 91 प्रकल्पासाठी पुरवण्यात येईल. तसेच, यामुळे 3 लाख 77 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल, नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. एवढी मोठी रक्कम प्रथमच राज्याला देण्यात येत आहे. या निधामुळे अनेक प्रकल्पाचे काम आता युद्धपातळीवर सुरु करण्यात येईल. यामुळे शेतकरी आत्महत्या आता थांबतील. त्याचबरोबर, या निधीचा सर्वात मोठा फायदा दुष्काळी भागाला होणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Center Announces amount For Irrigation Of Maharashtra Incomplete Projects Will Be Completed