सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना महाराष्ट्रासाठी केंद्राचा मोठा निर्णय

वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रात सत्तास्थापनेची तिढा कायम असताना केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या वतीने 7207.79 कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारकडे मागितली आहे. कालच एक शासकीय निर्णयाद्वारे 2059 कोटी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वितरित करण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्रात सत्तास्थापनेची तिढा कायम असताना केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या वतीने 7207.79 कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारकडे मागितली आहे. कालच एक शासकीय निर्णयाद्वारे 2059 कोटी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वितरित करण्यात आली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीसाठी प्रतिहेक्‍टरी हेक्‍टरी 6800 रूपये, बागायती शेतीसाठी प्रति हेक्टरी 13500, फळबागांसाठी प्रति हेक्टर 18000 रुपये अशी मदत देण्यात येणार आहे. राज्यात अवकाळी पाऊस पडून शेतीचे मोठं नुकसान झालेलं आहे. याची पाहणी करण्यासाठीही पाच सदस्यीय केंद्रीय पथक उद्या (ता.20) महाराष्ट्रात दाखल होणार आहे. दिनांक 22, 23 आणि 24 नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये हे पथक राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि नाशिक या विभागांमध्ये हे पथक भेट देणार आहे. डॉ. व्ही. तिरुपुगल यांच्या नेतृत्वाखाली पथक महाराष्ट्रात येणार आहे.

झेडपी शाळांना शुक्रवारी नव्हे शनिवारी सुटी

अवकाळी पावसाचा फटका राज्यातील 34 जिल्हे आणि 352 तालुक्यांना बसलेला असून 94 लाख हेक्‍टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. तर याचा फटका राज्यातील एक कोटी तीन लाख शेतकऱ्यांना बसलेला आहे. औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक या तीन विभागात मोठं नुकसान झाले आहे. या पावसामुळे सर्वाधिक फटका सोयाबीन आणि त्यानंतर कापूस या पिकाला बसलेला आहे. दरम्यान, औरंगाबाद विभागाची पाहणी डॉ. व्ही तिरुपुगल आणि डॉ. मनोहरन हे अधिकारी करणार आहेत. अमरावती आणि नागपूर विभागाची पाहणी डॉ. आर.पी. सिंग आणि नाशिक विभागाची पाहणी दीनानाथ आणि डॉ. सुभाषचंद्रा हे करणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Center government take decision for Maharashtra farmer