नवीन शैक्षणिक धोरणाविरोधात शिक्षक संघटना छेडणार राज्यव्यापी आंदोलन!

Strike
StrikeSakal media

मुंबई : केंद्र सरकारने (central government) आणलेले नवीन शैक्षणिक (new education policy) धोरण हे देशातील सर्वसामान्य विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि एकूणच जनतेच्या विरोधात (against people) आहे. त्यामुळे हे धोरण रद्द करण्याच्या मागणीसाठी (parents union) राज्यात 9 ऑगस्ट रोजी शिक्षण बचाव मंच आणि शिक्षक, पालक (teacher) संघटनांकडून (state level strike) राज्यव्यापी आंदोलन छेडले जाणार आहे. (central government-new education policy-parents union-teacher-state level strike-nss91)

केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणाची राज्यात महावीकास आघाडी सरकारने अमंलबजावणी करू नये अशी प्रमुख मागणी या आंदोलनात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. या धोरणामुळे राज्यातील शालेय आणि उच्च शिक्षणातील सर्व अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडीत काढली जाणार असून केवळ भांडवली शिक्षण व्यवस्था आणून या देशात शिक्षण हे केवळ मूठभर लोकांसाठीच ठेवले जाणार आहे, त्यामुळे राज्य सरकारने या धोरणाला विरोध करावा आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

Strike
महापालिकेचा नगरसेवकांच्या चमकोगिरीला नकार, फलकांसाठी जागा नाही

राज्यात लॉकडाऊन दरम्यान, शालेय आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात सर्व स्तरांवरील विद्यार्थ्यांची होत असलेली गळती थांबवावी, यासाठी विशेष कार्यक्रम राबवावा, शिक्षण अधिकार कायद्याअंतर्गत आर टी ई च्या रिक्त राहिलेल्या हजारों जागावर गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला असून या सर्व मुलांचे नव्याने प्रवेश करावेत, वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात यावी. अप्रशिक्षित शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, आदी अनेक मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com