कोरोनाचा इशारा देणार 'आरोग्य सेतू'; रुग्णापासून राहता येणार सुरक्षित

ब्रिजमोहन पाटील
Friday, 3 April 2020

प्रकृती कशी त्यावरून अॅपचा कलर बदलतो. धोका जास्त असेल तर गडद केसरी, थोडा धोका असेल तर फिकट केसरी आणि धोका नसेल तर हिरव्या रंगात अॅप दिसते.

पुणे : आपल्या आसपास 'कोरोना' पाॅझिटिव्ह व्यक्ती असेल, हे आपल्याला कसे कळणार? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. यावर आता उत्तर सापडले आहे. केंद्र सरकारने 'आरोग्य सेतू' नावाचे अॅप तयार केले आहे. त्यावर आपल्या शेजारी कोरोनाचा रुग्ण किंवा कॅरियर जवळ येताच, मोबाईलवर सावधानतेचा इशारा मिळणार आहे. त्यामुळे सामाजिक अंतर राखणे ही शक्य होणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'कोरोना'चे संक्रमण गतीने होते, त्यावर नियंत्रण आणणे अवघड आहे, म्हणूनच त्याला रोखण्यासाठी देश लाॅकडाऊन करावा लागला. घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना 'सामाजिक अंतर' राखण्याच्या सूचना आहेत, पण बाहेर फिरणाऱ्यांमध्ये कोणाला कोरोना झालाय, आपल्या सभोवती थांबलेली व्यक्ती व्यवस्थित आहे का हे समजू शकत नाही.

Image may contain: text

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना हा विषाणू परदेशवारी झालेल्या किंवा त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीं व्यतिरिक्त इतरांना होत असेल, तर हा तिसरा टप्पा धोक्याचा आहे. आपला देश तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर असताना 'आरोग्य सेतू' हे अॅप केंद्र शासनाने सर्वांसाठी उपलब्ध करून दिले आहे. 

- कर्जमाफीच्या सवलतीचा अध्यादेश काही निघेना; घोषणा झाली अंमलबजावणी केव्हा?

काय आहे अॅपमध्ये

हे अॅप वैयक्तिक आरोग्य स्थिती कशी आहे याची माहिती देते.  जर आपल्याला 'कोरोना'चा धोका नसेल, पण अस्वस्थ वाटत असेल तर रुग्णालयात न जाता फोन द्वारे किंवा व्हिडिओ काॅलद्वारे डाॅक्टरांशी संपर्क साधावा. पण धोका असेल तर चाचणी करून घ्या असा सल्ला दिला जातो. तसेच 'कोरोना' म्हणजे काय? तो टाळण्यासाठी काय करावे काय करू नये याची माहिती अॅपमध्ये आहे. 

- गृहिणींसाठी महत्त्वाची बातमी; उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ३ महिन्यांसाठी मोफत गॅस सिलिंडर

असा मिळतो सावधानतेचा इशारा 

हे अॅप ज्यांनी डाऊनलोड केले आहे त्यात  मोबाईल क्रमांक , नाव टाकल्यानंतर हे अॅप मोबाईलमधील ब्ल्यूट्यूथ व जीपीएसवर जोडले जाते. आपली प्रकृती चांगली असल्यास त्याबाबत इतरांना कोणताही सावधानतेचा इशारा मिळत नाही. पण 'कोरोना'ची लक्षणे असलेल्या व्यक्ती ज्याच्याकडे हे अॅप आहे, तो जवळ आल्यास त्यावरून लगेच सावध होण्याचा इशारा मोबाईलवर मिळतो.  त्यामुळे अशा व्यक्तींशी संपर्क टाळून स्वतःचे संरक्षण करणे शक्य आहे. 

Image may contain: possible text that says 'Aarogya Setu सुरक्षित आहेस कोरोना विषाणूच्या संसर्गाचा कमी धोका कृपया अद्यतनित रहाण्यासाठी नियमितपणे अप तपासा तयार रहा पण घाबरू नका आपण अस्वस्थ असताना आपल्या संसर्गाचा धोका कमी असतो. लक्षात ठेवा की सध्या हॉस्पिटलला भेट देण्यापेक्षा फोन किंवा व्हिडिओद्धारे डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित आहे.कोरोनाव्हायरसच्या संपर्कात येण्याची कोणतीही शक्यता आपण घरीच राहावे अशी आम्ही शिफारस करतो. अधिक माहितीसाठी कृपया www.mohfw.gov.in भेट द्या. COVID-19 Help हेल्पसेन्टर ५ सेल्फ असेसमेंट टेस्ट COVID-19 वर अधिक माहिती'

- 'तबलिगी जमात'मध्ये आले होते ४१ देशांचे नागरिक; ९६० जणांची यादी जाहीर!

ही माहिती भरणे अत्यावश्यक

- लिंग, वय  
- कफ, ताप, श्वसनाचा त्रास आहे का? की यापैकी काही नाही. 
- मधुमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुसांचा त्रास, हृदयरोग आहे का? 
- आपण परदेशात जाणून आला आहात का? 
- जर आला असेल तर स्वतःला घरात क्वारंटाइन करा, कुटुंबीयांपासून ६ फुट लांब रहा अशी सूचना दिली जाते
- कोरोना संक्रमित व्यक्तीशी संपर्क आला का? आला असेल तर कोरोनाचा धोका जास्त आहे. 
- १०७५ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून चाचणीची वेळ घ्या.
- प्रकृती कशी त्यावरून अॅपचा कलर बदलतो. धोका जास्त असेल तर गडद केसरी, थोडा धोका असेल तर फिकट केसरी आणि धोका नसेल तर हिरव्या रंगात अॅप दिसते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Govt launched Arogya Setu app to warn people about Covid 19