‘हल्ले रोखण्यासाठी केंद्रीय कायदा करा’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

मुंबई - राज्यात दर तीन महिन्याला डॉक्‍टरांवर हल्ले होत आहेत. राजकीय दबावशक्तीमुळे सर्वच प्रकरणे समोर येत नाहीत. हे वाढते हल्ले रोखण्यासाठी केंद्रीय पातळीवर ‘मेडिकल इस्टेब्लिशमेंट ॲण्ड डॉक्‍टर्स प्रोटेक्‍शन ॲक्‍ट’ आणला जावा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे.

राष्ट्रीय डॉक्‍टर दिनानिमित्त रविवारी जुहू येथील इंडियन मेडिकल असोसिशएनच्या कार्यालयात झालेल्या चर्चासत्रात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या वेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) बोर्ड ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव डॉ. जयेश लेले, राज्याचे सचिव पार्थिव सांघवी, माजी अध्यक्ष डॉ. संजय दुधाट आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. लेले म्हणाले, की डॉक्‍टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आजही गंभीर आहे. 

Web Title: The central law to prevent doctor attacks

टॅग्स