esakal | मध्य महाराष्ट्रासह कोकणात थंडी
sakal

बोलून बातमी शोधा

Cold

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण असल्याने या भागांत थंडी वाढली आहे. तर मराठवाडा व विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरण असल्याने थंडी कमी झाली आहे. बुधवारी सकाळी निफाड येथे नीचांकी ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मध्य महाराष्ट्रासह कोकणात थंडी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण असल्याने या भागांत थंडी वाढली आहे. तर मराठवाडा व विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरण असल्याने थंडी कमी झाली आहे. बुधवारी सकाळी निफाड येथे नीचांकी ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मध्य महाराष्ट्रात येत्या चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील थंडीमुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने घट झाली. कोकणात किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. मराठवाड्यात थंडी कमीअधिक प्रमाणात आहे.

Edited By - Prashant Patil

loading image