esakal | मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हलका ते मध्यम पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हलका ते मध्यम पाऊस

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हलका ते मध्यम पाऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - मॉन्सून (Monsoon) देश व्यापत असताना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने (Rain) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही ढगाळ हवामान असून, काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. या पावसामुळे पिकांना चांगलीच नवसंजीवनी मिळाल्याने पिकांची वाढ जोमदारपणे सुरू आहे. (Central Maharashtra Marathwada Vidarbha Rain)

कोकणात भात लागवडीला वेग

पावसाअभावी रखडलेल्या भात लागवडीला अखेर उशिराने का होईना चांगलाच वेग आला आहे. मागील काही दिवसांपासून कोकणात चांगलीच दाणादाण उडवली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबईसह सर्वच भागांत पावसाने अक्षरश हाहाकार उडवला आहे. अनेक ठिकाणी शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला आहे. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे.

हेही वाचा: Corona Update: राज्यात पुन्हा वाढले कोरोना मृत्यू

राज्यातील स्थिती

  • नगर, कोल्हापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यांच्या पश्‍चिम पट्ट्यात पावसाचा जोर अधिक

  • मराठवाड्यातील काही भागांत पावसाचा दणका सुरूच. आज सकाळपर्यंत अनेक भागांत पावसाच्या जोरदार सरी

  • कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकांना आधार

  • पूर्व विदर्भात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली असली, तरी पश्‍चिम विदर्भात पावसाचा जोर कमी होता. धरणे भरण्यासाठी जोरदार पाऊस अपेक्षित

  • राजापूर परिसरातील दीडशेहून अधिक लोकांना प्रशिक्षित तरुणांनी सुरक्षित स्थळी नेले

  • खेड तालुक्यात (जि. रत्नागिरी) गेल्या चोवीस तासात पावसाची दमदार हजेरी. जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ

loading image