Amit Shah: शहांच्या मुंबईत येण्याने राजकीय घडामोडींना वेग; शिंदेंसह फडणवीसांसोबत पाऊण तास चर्चा

अमित शाह मुंबई दौऱ्यावर असताना शिंदे, फडणवीस यांच्यासोबत तब्बल पाऊस तास चर्चा केली
Amit Shah
Amit ShahEsakal

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच भाजपच्या मोठ्या हालचाली सुरू असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या भूमिकांना महत्त्व प्राप्त झालं आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यातील दौरे वाढल्याचे दिसून येत आहे. अमित शहा आज पुन्हा मुंबई दौऱ्यावर आले आहेत. (Latest Marathi political news)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबत जवळपास पाऊण तास चर्चा केल्याची माहीती आहे. आमदार पराग अळवणी यांच्या विलेपार्ले येथील निवासस्थानी ही चर्चा झाल्याचे समजते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त 'News18 लोकमत' ने दिले आहे.

Amit Shah
Maharashtra Politics: "लेकी बोले सुने लागे" जयंत पाटलांच्या आडून शिंदे गटाच्या नेत्याचा फडणवीसांना टोला

मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत खासगी कार्यक्रमासाठी आले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांची भेट देखील घेतली आहे. यावेळी अमित शाह आणि त्यांच्यामध्ये आमदार पराग अळवणी यांच्या विलेपार्ले येथील निवासस्थानी चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशावर झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

Amit Shah
Sushma Andhare: 'अमित शाहांनी सारखं-सारखं अप-डाऊन करू नये, त्यांनी…',मुंबई दौऱ्यावरून अंधारेंची खोचक टीका!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com