रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकीटमध्ये कपात; मध्य रेल्वेची घोषणा | Central Railway | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

platform ticket

रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकीटमध्ये कपात; मध्य रेल्वेची मोठी घोषणा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) कडून आता प्रवाश्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. कोरोना निर्बंधामध्ये शिथिलता आल्यानंतर आता प्लॅटफॉर्म तिकिटात (platform ticket price) कपात केली आहे. कितीने आणि कुठल्या स्थानकावर ही कपात केलीय. वाचा सविस्तर..

'या' स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत

मध्य रेल्वेकडून सांगण्यात आल्याप्रमाणे हे बदल 25 नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून लागू होणार आहेत. अधिसूचनेनुसार, 'कोविड-19 महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता लक्षात घेऊन सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत 50 रुपयांवरून कमी करण्यात आली आहे. रेल्वेने सर्व बुकिंग कर्मचारी आणि पर्यवेक्षकांना बदल स्वीकार करण्याची आणि यानुसार काम करण्याची सूचना दिली आहे.

हेही वाचा: समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा आणखी एक पुरावा! मलिकांचा बॉम्ब

दहा रुपयात प्लॅटफॉर्म तिकीट

स्टेशनवर प्रवाशांची होणारी गर्दी टाळण्यासाठी कोरोना महामारीत प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत 50 रुपये करण्यात आली होती. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकावर 10 रुपयात प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार आहे.

हेही वाचा: एसटी संप सुरुच राहणार; विलीनीकरणाच्या मागणीवर संपकरी ठाम

loading image
go to top