Corona Effect : रेल्वेने घेतली कोरोनाची धास्ती; 'या' 23 रेल्वेगाड्या रद्द!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

राज्य सरकार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लोकांना कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये, यासाठी गर्दी होईल अशा ठिकाणी जाण्यास मज्जाव घातला आहे.

पुणे : कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने आता मध्य रेल्वेने रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सूचना येईपर्यंत रेल्वे गाड्या स्थगित करण्यात आल्या आहेत.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

स्थानकाच्या आवारातील आणि प्लॅटफॉर्म वरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यासह पुणे विभागातील पुणे, मिरज आणि कोल्हापूर स्थानकांतील रिटायरिंग रुम, डोरमेटरी 15 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

- मोठी बातमी - सर्व शासकीय कार्यालयं पुढील ७ दिवस राहणार बंद

रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्या पुढीलप्रमाणे :

1) मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस 19. मार्च ते 31 मार्च
2) पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस 18 मार्च ते 30 मार्च
3) लोकमान्य टिळक टर्मिनस -अजनी एक्सप्रेस 18 मार्च ते 30 मार्च
4) अजनी- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 20 मार्च ते 27 मार्च
5) लोकमान्य टिळक टर्मिनस निजामाबाद एक्सप्रेस 21मार्च ते 28 मार्च
6) निजामाबाद- लोकमान्य टिळक एक्सप्रेस 22 मार्च  ते 29 मार्च
7) नागपूर-रीवा एक्सप्रेस 25 मार्च
8) मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस 23 मार्च ते 1एप्रिल
9) नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस 22 मार्च ते 31 मार्च
10) पुणे-नागपूर एक्सप्रेस 26 मार्च ते 2 एप्रिल

- महाराष्ट्रातील ३९ जण उझबेकिस्तानमध्ये अडकले; शरद पवारांचे परराष्ट्र मंत्र्यांना पत्र!

11) नागपूर-पुणे एक्सप्रेस 20 मार्च ते 27 मार्च
12) पुणे-अजनी एक्सप्रेस 21 मार्च ते  28 मार्च
13) अजनी-पुणे एक्सप्रेस 22 मार्च ते 29 मार्च
14) लोकमान्य टिळक टर्मिनस -मनमाड एक्सप्रेस 18 मार्च ते 31 मार्च
15) मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस 18 मार्च ते 31
16) पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस 19 मार्च ते 1 एप्रिल
17) भुसावळ-नागपूर एक्सप्रेस 18 मार्च ते 29 मार्च
18) नागपूर-भुसावळ एक्सप्रेस 19 मार्च  ते 30 मार्च
19) कलाबुरागी-सिकंदराबाद एक्सप्रेस 18 मार्च ते 31 मार्च
20) हावडा-मुंबई दुरंतो एक्सप्रेस 24 मार्च ते 31 मार्च
21) मुंबई-हावडा दुरंतो एक्सप्रेस 25 मार्च ते 1 एप्रिल
22) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस 20, 23, 27 आणि 30 मार्चला बंद
23) निजामुद्दीन- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राजधानी एक्सप्रेस 21, 24, 26 आणि मार्च ते  31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत मध्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

- Corona Effect : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; 'या' तिकिटांच्या दरांत वाढ!

दरम्यान, राज्य सरकार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लोकांना कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये, यासाठी गर्दी होईल अशा ठिकाणी जाण्यास मज्जाव घातला आहे. यासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने प्लॅटफॉर्मच्या तिकिटाच्या दरांत वाढ केली आहे. आता प्लॅटफॉर्मच्या तिकीटासाठी ५० रुपये आकारणी केली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central railway cancelled long distance trains due to low occupancy