प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला प्रमाणपत्र  -  बडोले

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 एप्रिल 2018

बेलापूर - राज्य सरकारकडून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी यांच्याकडे प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. हे प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणींमुळे त्यांना योजनांच्या लाभापासून दूर राहावे लागते. ही अडचण दूर करण्यासाठी राज्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी रविवारी (ता. 8) सीवूड्‌स येथे दिली. 

अकराव्या जागतिक ऑटिझम दिनानिमित्त जनजागृती मोहिमेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. सीवूड्‌स येथील ऑटिझम कनेक्‍टअंतर्गत न्यूरोजन ब्रेन ऍण्ड स्पाईन इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. बडोले म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंग शब्द बदलून दिव्यांग शब्द आणला आहे. त्यामुळे त्यामागची भावनाही बदलली आहे. स्वमग्न नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी सरकारद्वारे विमा योजना राबवली जाते. या व्यक्तींचे पालकत्व स्वीकारण्यासाठीही कायदा आहे, असे त्यांनी सांगितले. 

न्यूरोजन ब्रेन ऍण्ड स्पाईन इन्स्टिट्यूटचे संचालक तथा न्यूरोसर्जरीचे प्रमुख डॉ. अलोक शर्मा यांनी चार वर्षांपासून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. 

Web Title: Certificate to every handicap person