‘चासकमान’मध्ये सापडला बारा किलोचा कटला मासा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

चास - चासकमान धरणात मासेमारी करत असताना माजगाव (ता. खेड) येथील बाळासाहेब मुकणे यांना जाळ्यामध्ये बारा किलो वजनाचा कटला मासा सापडला.

गेल्या काही दिवसांपासून चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरवात झाली आहे. धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने त्यात नवीन येणारे पाणी हे गढूळ असल्याने मोठे मोसे साहजिकच पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. धरणात पूर्वीचे असणारे स्वच्छ पाणी व नवीन आलेले गढूळ पाणी जेथे एकत्र होते, तेथे मोठे मासे पकडणे सोपे जाते.

अशाच ठिकाणी बाळासाहेब मुकणे हे मासेमारी करत असताना त्यांना मोठ्या प्रमाणात मासे सापडले. त्यात सगळ्यात मोठा बारा किलो वजनाचा कटला मासा मिळाला. चासकमान धरणातील पाणीसाठा गेल्या दोन वर्षांत शून्याच्या वा उणे स्थितीत न पोचल्याने मोठे मासे खोल पाण्यात लपून बसले; मात्र गढूळ पाण्यामुळे हे मासे खोल पाण्यातून उथळ पाण्याकडे झेपावले व कोळ्यांनी टाकलेल्या जाळ्यात अलगद सापडले.

Web Title: chaaskaman news fish dam