Chhagan Bhujbal: शाळेत सरस्वती शारदेचा फोटो का? भुजबळांचे वादग्रस्त विधान

राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ सध्या चर्चेत आले आहेत.
Chagan Bhujbal Controversial Statement On Saraswati Devi
Chagan Bhujbal Controversial Statement On Saraswati Devi esakal

राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ सध्या चर्चेत आले आहेत. शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात ? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. भुजबळ यांच्या विधानावर भाजपचे नेते राम कदम यांनी टीकास्त्र सोडलं आहे.(Chagan Bhujbal Controversial Statement On Saraswati Devi )

शाळेत महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत. त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात,' असा सवाल एका कार्यक्रमादरम्यान भुजबळांनी उपस्थित केला.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दीडशे वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त 'अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे'तर्फे सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी भुजबळ बोलत होते.

नेमकं काय म्हणाले भुजबळ?

अंधश्रद्धा आणि आमच्या महिला-भगिनींबाबत काही विचारायला नको किंवा काही सांगायला नको. शाळांमध्ये सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेबांचा फोटो लावा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा फोटो लावा.

पण, सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. त्यांना आम्ही काही पाहिले नाही. त्यांनी आम्हाला काही शिकवले नाही. त्यांनी 'तीन टक्के' लोकांना शिकवले. आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची,' असा प्रश्न भुजबळ यांनी केला. अधिक बोललो असेल तर माफ करा, असे सांगत या महापुरुषांची आणि त्यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे, असे आवाहन भुजबळ यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com