क्षीरसागर सांगतील त्यास विधानसभेची उमेदवारी देण्याची होती तयारी- भुजबळ

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 मे 2019

जयदत्त यांना लोकसभा निवडणूक लढवावी आणि विधानसभा निवडणुकीसाठी ते सांगतील त्यास उमेदवारी दिली जाईल, असे सांगण्यात आले होते, तरीही त्यांनी मान्य केले नाही आणि राष्ट्रवादी सोडली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

बीड: जयदत्त यांना लोकसभा निवडणूक लढवावी आणि विधानसभा निवडणुकीसाठी ते सांगतील त्यास उमेदवारी दिली जाईल, असे सांगण्यात आले होते, तरीही त्यांनी मान्य केले नाही आणि राष्ट्रवादी सोडली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडल्याचे दुःख झाले असून, पक्षाचे नुकसान झाले आहे. शरद पवार आणि मी स्वतः क्षीरसागर यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र मी अपयशी ठरलो. जयदत्त क्षीरसागर यांचे बीडमधील एका मुंडेंसोबत वाद होता, तर दुसऱ्या मुंडेंसोबत चांगले संबंध होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचा प्रचार केला असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान, माजी मंत्री आणि बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत आज शिवसेनेत प्रवेश केला. जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत आज (ता.22) प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी सोडण्याचा खूप आधी निर्णय झाला असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chagan Bhujbals Statement on jaydatta kshirsagar enters in Shivsena