मराठा क्रांती मोर्चातर्फे आज 'चक्काजाम' 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 31 जानेवारी 2017

मराठा क्रांती मोर्चाचे चक्‍काजाम यशस्वी होऊ नये, अशी खेळी यामागे असल्याचा आरोप करत अशा पत्रकामुळे क्रांती मोर्चाचे मनोधैर्य खचणार नाही. मराठा समाज स्वत:च्या कायदेशीर मागण्या अहिंसेच्या मार्गानेच पूर्ण होतील, यासाठी कटिबद्ध असल्याचे मराठा समन्वय समितीने स्पष्ट केले आहे. 

मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (मंगळवारी) राज्यभरात 'चक्‍काजाम' आंदोलन होणार असून, क्रांती मोर्चाप्रमाणे अहिंसक मार्गानेच हे आंदोलन शांततेत करावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने आज केले.

मुंबईत आज सकाळी अकरा ते दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान विविध ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. आतापर्यंतच्या मूक मोर्चांत मराठा समाजाने अहिंसा व संयम यांचा आदर्श जगाला घालून दिला आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाने या आचारसंहितेचे पालन करूनच चक्‍काजाम आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने केले आहे. 

दरम्यान, एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीचाही समन्वय समितीने समाचार घेतला. संबंधित जाहिरात मराठा आरक्षणाची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या सरकारी वकिलाने दिल्याचा दावा करत, या वकिलाला सरकारने मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या जबाबदारीतून मुक्‍त करण्याची मागणी पत्रकात केली आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे चक्‍काजाम यशस्वी होऊ नये, अशी खेळी यामागे असल्याचा आरोप करत अशा पत्रकामुळे क्रांती मोर्चाचे मनोधैर्य खचणार नाही. मराठा समाज स्वत:च्या कायदेशीर मागण्या अहिंसेच्या मार्गानेच पूर्ण होतील, यासाठी कटिबद्ध असल्याचे मराठा समन्वय समितीने स्पष्ट केले आहे. 

Web Title: chakka jam agitation by Maratha Kranti Morcha