चलो अयोध्या, चलो वाराणसी शिवसेनेची मुंबईत पोस्टरबाजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

मुंबई : वाराणसीत जाऊन रामाचे दर्शन आणि गंगा पुजा करण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करतातच, मुंबईत ठिकठिकाणी चलो आयोध्या, चलो वाराणसी असे पोस्टबाजी करून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन करण्यास शिवसैनिकांनी सुरूवात केली. आगामी लोकसभा निवडणूकीत हिंदूत्वाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेऊन भाजपची कोंडी करण्यासाठीच ही घोषणा केल्याचे बोलले जात आहे.

या पोस्टरमध्ये 'चलो अयोध्या, चलो वाराणसी, देशाच्या राजकारणातील महत्त्वाकांक्षी पाऊल', 'चलो अयोध्या, चलो वाराणासी' आणि 'सौ सोनार की एक लोहार की' असे या पोस्टरवर लिहीण्यात आले असून या दौऱ्यात शिवसैनिकांनी सामील व्हावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

दैनिक 'सामना'तील तिसऱ्या आणि अंतिम मुलाखतीच्या भागात उद्धव ठाकरे यांनी आयोध्येला जाऊन गंगा आरती करण्याची घोषणा केली. या संदर्भातील नियोजीत कार्यक्रमाची लवकरच घोषणा केली जाईल असेही त्यांनी सांगितले होते. आगमी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवून भाजपची कोंडी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळेच हिंदूत्वाच्या मुद्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. मागील चार वर्षापासून सरकारकडे पूर्ण बहूमत असूनही राम मंदिराचा प्रश्न सोडविण्यात भाजपला अपयश आले आहे. अशात निवडणूकीत राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. या मुद्दाला हवा देऊन तापत ठेवल्यास याचा राजकीय फायदा होऊ शकतो असे काही राजकीय जाणकारांचे मत आहे.

Web Title: Chalo Ayodhya, Shivsena show poster in Mumbai