विदर्भात पावसाची शक्यता

विदर्भात पावसाची शक्यता

पुणे - पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत असल्याने पूर्व भारतातील छत्तीसगड, बिहार, झारखंडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोषक हवामान असल्याने विदर्भातही आजपासून (ता. २३) हलक्या पावसाचा अंदाज आहे. यातच उत्तरेकडून थंड वारे आल्याने उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.  

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. शनिवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे राज्यातील उच्चांकी ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथील गहु संशोधन केंद्रात नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमान नोदले गेले. राज्याच्या कमाल व किमान तापमानात चढउतार सुरूच असून, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, नांदेड येथे तापमान ३५ अंशांच्या आसपास आहे.

पूर्व भारतात गारपिटीचा इशारा
 उत्तरेकडून व पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा संगम होत असल्याने पूर्व भारतात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. उद्यापासून (ता. २३) विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com