राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

पुणे - मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत पुढील दोन दिवसांमध्ये वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे गुरुवारी वर्तविण्यात आला. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे 43.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

राज्यात बहुतांश ठिकाणी गुरुवारी कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अंशतः वाढलेला होता. पुढील चोवीस तासांमध्ये राज्यातील आकाश ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात अंशतः वाढ झाली आहे. 

राजस्थानमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. तेथे कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदविले जात आहे. पूर्व राजस्थान आणि पश्‍चिम मध्य प्रदेश येथे पुढील दोन ते तीन उष्णतेची लाट कायम राहणार आहे. 

पावसाची शक्‍यता का? 
दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भाचा पश्‍चिम भाग, पश्‍चिम मध्य प्रदेश आणि मराठवाडा येथे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील दोन दिवसांमध्ये पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. 

पुण्यात रात्री उकाडा वाढला 
पुण्यात कमाल तापमानाचा पारा 38.6 अंश सेल्सिअस नोंदला गेला, तर गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत नोंदलेल्या किमान तापमानाचा पारा 22.2 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला होता. यात सरासरीपेक्षा 4.1 अंश सेल्सिअसने वाढ झाली. यामुळे उकाड्यात वाढ झाल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडलेली शहरे ः 
विदर्भ ः अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वाशीम, वर्धा, यवतमाळ, 
मराठवाडा ः परभणी, नांदेड 
मध्य महाराष्ट्र ः नगर, मालेगाव, सोलापूर. 

Web Title: Chances of rain in maharashtra