आझाद यांची लातुरातील सभाही रद्द 

आझाद यांची लातुरातील सभाही रद्द 

लातूर -  "सरकार हमसे डरती हैं, पुलिस को आगे करती हैं... कौन आया रे कौन आया...' अशा घोषणांनी युवा भीम सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. 2) परिसर दणाणून सोडला आहे. "भीम आर्मी'चे संस्थापक चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांच्या लातुरातील सभेलाही पोलिसांनी परवानगी नाकारल्याने कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीतून निषेध नोंदविला. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आझाद यांची सभा विद्यापीठ प्रशासनाने नाकारली. त्यानंतर "एसएसपीएमएस' मैदानावरील सभेलाही परवानगी मिळाली नाही. मुंबईतही त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यामुळे लातूर येथे आझाद यांच्या उपस्थितीत होणाऱ्या युवा भीम सेनेच्या महाअधिवेशनाकडे अनेकांचे लक्ष लागले होते. लातुरातील युवा भीम सेनेच्या अधिवेशनासाठी आयोजकांनी परवानगी घेतली होती. मात्र मंगळवारी (ता. 1) रात्री कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करीत पोलिसांनी परवानगी नाकारली. 

"देशात अघोषित आणीबाणी' 
मी देशद्रोही किंवा दहशतवादी नाही; स्वतंत्र भारताचा, राज्यघटनेला मानणारा, बाबासाहेबांचे विचार सांगणारा सजग नागरिक आहे; पण माझा आवाज वारंवार दाबला जातो. याचाच अर्थ देशात अघोषित आणीबाणी सुरू झाली. या हुकूमशाही सरकारला जनताच येणाऱ्या निवडणुकांत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत "भीम आर्मी'चे संस्थापक चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांनी सरकारवर टीकास्र सोडले. देशात "सरकार वापसी'ची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. आझाद यांच्या सभेला पोलिसांनी लातुरात मनाई केल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com