Devendra Fadavis: फडणवीस हुशार माणूस त्यांनी काँग्रेसचे 22 आमदारही तयार ठेवलेत, शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadavis

Devendra Fadavis: फडणवीस हुशार माणूस त्यांनी काँग्रेसचे 22 आमदारही तयार ठेवलेत, शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट

राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंद केलं त्यानंतर राज्यात सत्तापालट झाली. त्यानंतर सत्तासंघर्षाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी ठाकरे गटाकडून कोर्टात करण्यात आली. एकीकडे सुनावणी सुरू असताना आता ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. हे सरकार पडणार म्हणून भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवलेत, असा दावा खैरे यांनी केला आहे.

चंद्रकांत खैरे बोलताना म्हणाले की, कोर्टातील सुनावणीमध्ये शिंदे गटातील 16 आमदार अपात्र ठरू शकतात. हे आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडू शकतं. हे आमदार अपात्र ठरल्यानंतर आपला मुख्यमंत्री कसा करायचा याचा प्लॅनही देवेंद्र फडणवीस यांनी तयार करून ठेवला आहे. फडणवीस हुशार माणूस आहे. त्यांनी दुसरीकडे काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवलेत, असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

हेही वाचा: Sushma Andhare: सभेची काळजी घेता येत नसेल तर फडणवीस...; अंधारेंची कठोर टीका

राज्यातील 22 नाराज आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. हे 22 आमदार कुठले आणि कोण आहेत? यांच्याबद्दल चंद्रकांत खैरे यांनी जास्त काही सांगणं टळलं आहे. सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. त्यामुळे हे 22 नेते शांत असल्याचंही चंद्रकांत खैरे बोलताना म्हणालेत.

हेही वाचा: Devendra Fadnavis: पांडुरंगाच्या आशीवार्दानेच करेक्ट कार्यक्रम केला; फडणवीसांचं विधान