चारवेळचा खासदार आता आमदारकीच्या रिंगणात?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण, चंद्रकात खैरे यांची आता विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्यांनी वैजापूर मतदारसंघात दौरे सुद्धा सुरु केल्याची चर्चा पहायला मिळत आहे. 

मुंबई - शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण, चंद्रकात खैरे यांची आता विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्यांनी वैजापूर मतदारसंघात दौरे सुद्धा सुरु केल्याची चर्चा पहायला मिळत आहे. 

शिवसेनेचे माजी आमदार आर. एम. वाणी यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केल्याने मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्याने चंद्रकात खैरे वैजापूरमधून आपले नशीब आजमवणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत सलग चार वेळा खासदार राहिलेल्या खैरेंना 2019च्या लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यांनतर त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची चर्चा सुरु झाली. प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाहीत. त्यामुळे खैरे आता विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला आणि सद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या वैजापूर मतदारसंघातून खैरे चाचपणी करत आहे. गेल्या काही दिवसात त्यांच्या मतदारसंघात दौरे सुद्धा वाढले आहेत.

वैजापूर मतदारसंघातून आमदारकीची हॅटट्रिक करणारे माजी आमदार वाणी यांचा गेल्यावेळी राष्टवादीचे विद्यामान आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी पराभव केला होता. आगामी निवडणुकीत प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढवणार नसल्याचे वाणी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सेनेला येथून सक्षम असा उमेदवार मिळत नाही. त्यात लोकसभा निवडणुकीत सेनेला या मतदारसंघातून 10 हजाराचे मताधिक्य मिळाल्याने, सेनेसाठी ही जागा महत्त्वाची समजली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrakant khaire may contest maharashtra vidhansabha election