Maharashtra Politics : स्वत:ला धुरंधर समजणाऱ्यांना देवेंद्र पुरून उरले; पाटलांचा नाव न घेता शरद पवारांना टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar and Chandrakant Patil

Maharashtra Politics: स्वत:ला धुरंधर समजणाऱ्यांना देवेंद्र पुरून उरले; पाटलांचा नाव न घेता शरद पवारांना टोला

पुणे - पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील टीका टिप्पणी दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. त्यातच पाटील राष्ट्रवादीच्या टीकेला सातत्याने प्रत्युत्तर देत आहेत. आज पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं. (Sharad Pawar news in Marathi)

हेही वाचा: Urfi Vs Chitra wagh : उर्फी ज्यांना भावी सासू म्हणतेय, त्या चित्रा वाघ यांचा मुलगा कोण?

पाटील म्हणाले की, देवेंद्रजींना ते बोललेली गोष्ट कधीच मागे घ्यावी लागली नाही. पुण्यात एकाही पठ्ठ्याची हिंमत झाली नाही, देवेंद्रजींच्या बोलण्यावर आक्षेप घ्यायची, कारण त्यांचे भाषण अभ्यासपूर्वक असतं.

सचिन वाजेच्या प्रकरणात त्यांनी मला सांगितलं होतं, की 'दादा देखते रहो, आज में क्या बोलता हूं... सात वेळा त्या दिवशी त्यांचे भाषण सुरू असताना सभागृह तहकूब करावं लागलं. त्यामुळेच उद्धव ठाकरेंना वाजेंना निलंबित करावा लागलं.

हेही वाचा: Hasan Mushrif Ed raid : हसन मुश्रीफ यांच्या मुलीच्या घरावरही ईडीची छापेमारी

पाटील पुढं म्हणाले की, आधी दोन भोंगे वाजायचे सकाळी संजय राऊत आणि संध्याकाळी नवाब मलिक, मात्र देवेंद्रजींनी सगळा अभ्यास करून पुरावे शोधून काढले.

त्यामुळे दोघांची रवानगी कारागृहात झाली. महाराष्ट्रमध्ये माझ्या एवढा धुरंदर नाही, असं वाटणाऱ्या लोकांना देवेंद्र पुरून उरले. अशी टीका पाटील यांनी शरद पवारांचं नाव न घेता केली. तसेच देवेंद्र यांच्यामुळे अनेकाचे विदेश दौऱे बंद झाले.

मी जर देश सोडून गेलो तर देवेंद्रजी इथे काय करतील, या भीतीमुळेच हे दौरे बंद झाल्याचं पाटील म्हणाले.

हे ही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?