
Chandrakant Patil: वर्गणी, देणगी, माधुकरी अन् 'भीक' यातला फरकच पाटलांना माहित नाही? वाचा शब्दकोशातला अर्थ
Chandrakant Patil: पुण्याचे पालकमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार चंद्रकांत पाटील हे त्यांच्या फटकळ विधानासाठी ओळखले जातात. ते नेहमीच वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेतही आल्याचे दिसून आले आहे. आता पैठणमधील एका कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटील यांनी केलेलं विधान भलतेच चर्चेत आले आहे.
पुण्यातील कोथरूड मतदार संघातून आमदार म्हणून चंद्रकांत पाटील निवडून आले आहेत. यापूर्वी देखील त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांची चांगलीच चर्चाही झाली आहे. यावेळी मात्र त्यांनी केलेलं विधान जरा जास्तच आक्रमक आहे. सोशल मीडियावर ते व्हायरल झाले. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद पाहता दादांना पुन्हा त्या शब्दांवर खुलासा करावा लागला आहे. मात्र ते आपल्या शब्दांवर ठाम आहे.
हेही वाचा - How To Improve Your Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’
चंद्रकांत दादा पाटील म्हणाले होते की, फुले, आंबडेकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागून पैसे गोळा केले. त्यातून शाळा बांधल्या. आता यावेळी भीक या शब्दाचा अर्थ सांगताना पाटील यांनी आपल्याला सीएसआर फंड शब्द अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. पूर्वीच्या काळी माधुकरी मागितली जात असे. वर्गणी, देणगी म्हणजे तरी काय होतं, याप्रकारे दादांनी आपल्या भीक या शब्दाचा अर्थ पटवून दिला आहे.
शब्दकोशामध्ये भीक या शब्दाची व्याख्या आणि अर्थ पाहिला असता तो पूर्णपणे वेगळा असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये चंद्रकांत पाटलांनी सांगितलेला कोणताही अर्थ नसल्याचे दिसते. भिक्षा; दानधर्म. २ अभाव; कमताई; उणीव; वैगुण्य. 'सर्व गोष्टीची भीक आहे.' [सं. भिक्षा; प्रा. भिक्खा] म्ह॰ १ भिकेची हंडी शिंक्यास चढत नाहीं. २ भीक नको पण कुत्रा आवर. (वाप्र.) भीक असून द(दा)रिद्र(द्र्य)कां- भिक्षेकर्याचा धंदा पतकरल्यावर मग अडचण कां सोसावी? ॰काढणें-क्रि. अडचण सोसणें; दारिद्र्य अनुभविणें. ॰घालणें- क्रि. १ (ल.) वचकून असणें. 'तो माझ्यावर आपला अंमल चालवूं पाहतो, पण मी कोठें त्याला भीक घालायाला बसलों आहें !' भिकेचे डोहाळे होणें-क्रि. दारिद्र्यादि दुर्दशा येण्यापूर्वीं तदनुरूप पूर्वींच्या संपन्न स्थितीत विरुद्ध अशा वासना होणें.
याशिवाय भीक शब्दाचे अर्थ - भिक्षा मागणारा; भिकारी. म्ह॰ भीक मागत्या दहा घरें. भिकणें-न. १ भिक्षा मागून मिळालेली एखादी वस्तु; भिक्षा. (क्रि॰ मागणें). २ जोशी, भक्त, उपाध्याय इ॰ कांस दिलेलें बक्षीस, इनाम. ३ धर्मादाय. ४ धर्मादाय म्हणून सरकाराकडून घेण्यांत येणारा कर. ५ बलुतेंअलुतें; बलुतेदार इ॰ स धान्य देणें. ६ जकातीच्या उत्पन्नांतील पतकीस दिलेला हक्क. ७ भिकारीपणा; दारिद्र्य. (क्रि॰ लागणें) असा अर्थ मराठी शब्दकोशामध्ये नमूद आहे.