भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी 'या' नेत्याची निवड निश्चित

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी 'या' नेत्याची निवड निश्चित

मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने प्रदेशाध्यक्ष कोण याचा चर्चा सुरू झाली आहे. राज्यात नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्याच्या हालचाली भाजपमध्ये जोरात सुरू आहेत. चार महिन्यांवर आलेल्या निवडणुकांमुळे भाजपमध्ये विविध नेत्यांच्या नावांवर विचार सुरू आहे. या सर्वात आघाडीवर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव असून त्यांची निवड जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपाध्यक्ष अमित शहा यांचाही चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास असल्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार असल्याची चर्चा आहे. पाटील यांचं राज्याच्या मंत्रिमंडळातही नंबर दोनचं स्थान आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुका बघता त्यांच्यावर ही जबाबदारी टाकण्याचे पक्षश्रेष्ठींनी निश्चित केले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

पक्षश्रेष्टींकडून विचारणा झाली असली तरी चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी नकार दिल्याची भाजपच्या गोटातून सांगितले जात आहे. प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण विकासमंत्री पंकजा मुंडे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची नावे चर्चेत होती. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चंद्रकांत पाटील यांच्याच पारड्यात वजन टाकल्याने प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांचे नाव निश्चित झाले असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com