भितीमुळेच सेनेला 'हार्दिक' आधार- चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

जळगाव: मुंबई महापालिका निवडणुकीच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळणार आहे. त्यामुळे शिवसेनेत भीती निर्माण झाली असल्यानेच उद्धव ठाकरे यांनी हार्दिक पटेलचा आधार घेतला आहे. असा आरोप राज्याचे महसूलमंत्री व भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज जिल्हा परिषद निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे उपस्थित होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, मुंबईत भारतीय जनता पक्षाला महापालिका निवडणुकीत बहुमत मिळणार हे निश्‍चित आहे. शिवसेनेत भीती निर्माण झाल्याने उद्धव ठाकरे यांनी गुजरातमधील पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना मुंबईत आणले आहे. त्यांना त्याचा आधार घ्यावा लागला यातच त्यांचा पराभव दिसून येत आहे.

अजित पवार सैरभैर
(कै.) गोपीनाथ मुंडेनी पवारांच्या जन्मतारखेच्या दिवशीच आपला वाढदिवस ठरविला आहे. त्यांची जन्मतारीख ती नाहीच असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले होते. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, कि. मुंडे हे मोठे व्यक्ती होते त्यांना असे करण्याची कोणतीही गरज नाही. अजित पवार हे पराभवामुळे सैरभर झाल्याने ते असे वक्‍तव्य करीत आहे. मुंडेच्या भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाण्याच्या अजित पवारांच्या मुद्यावरही त्यांनी सडकून टीका केली. त्यांच्या काकांनी (शरद पवार) (कै.) वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्रिपद मिळविले आहे. त्यांना पक्षद्रोह आठवणार नाही तर काय?

Web Title: chandrakant patil criticize shivsena