भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जुलै 2019

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पाटील यांच्याकडील मंत्रिपद कायम ठेवत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पाटील यांच्याकडे संघटनेची जबाबदारी देण्याचे ठरवले आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. तर, मंगल प्रभात लोढा यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. 

मंत्रिमंडळातील दोन क्रमांकाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबादारी देण्यात आली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागणार हे निश्चित मानण्यात येत होते. विशेष म्हणजे पाटील यांच्याकडील मंत्रिपद कायम ठेवत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पाटील यांच्याकडे संघटनेची जबाबदारी देण्याचे ठरवले आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आली होती. तेव्हापासून प्रदेशाध्यक्षपद कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष होते. प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत सुरेश हळवणकर यांचेही नाव चर्चेत होते. पण, चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटनेची जबाबदारी पाटील यांच्याकडे द्यावी असा विचार पक्षात सुरु होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil may be elected BJP state president