...तर पक्षाच्या नावात 'शिव' वापरण्याचा अधिकार नाही; पाटलांचे मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र | Chandrakant Patil on CM Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil,Uddhav Thackeray

...तर पक्षाच्या नावात 'शिव' वापरण्याचा अधिकार नाही; पाटलांचे मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र

मुंबई : छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभा निवडणुका लढवणार नसल्याचं आज स्पष्ट केलं आहे. शिवसनेने म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही असं छत्रपती संभाजी राजे आजच्या पत्रकार परिषदेत बोलले आहेत. आपण कुणापुढे झुकून लढणार नाही असं म्हणत त्यांनी ही राज्यसभा निवडणुक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

(BJP Chandrakant Patil On Shivsena And CM Uddhav Thackeray)

२०१९ च्या निवडणुका भाजपा आणि शिवसेनेच्या आघाडीने लढवल्या होत्या. त्यानंतर निवडून आल्यावर मुख्यमंत्रीपदाच्या वादातून आघाडी मोडून महाराष्ट्रात महाविकासआघाडीचा जन्म झाला होता. त्यानंतर भाजपाने आम्हाला दिलेला शब्द पाळला नाही, असं म्हणत शिवसेनेने भाजपावर टीका केली होती. दरम्यान संभाजीराजेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर शब्द मोडल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर "शब्द मोडल्याचा आरोप ठेवून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल?" असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा: रिक्षाचालक ते 3 हेलिकॉप्टरचे मालक; CBIने अटक केलेले अविनाश भोसले कोण आहेत?

चंद्रकांत पाटील त्यांनी ट्वीट करत "राज्यसभा उमेदवारीबाबत उद्धव ठाकरेंनी शब्द मोडला. शिवसेनेत प्रवेशाचा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही, हे स्पष्ट केल्याचं छ. संभाजीराजे सांगताहेत. शब्द मोडल्याचा आरोप ठेवून करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल? संभाजीराजेही खोटं बोलताहेत? त्यांचा फोनही न घेणं कुठल्या सभ्यतेत बसतं?" असा सवाल करत चंद्रकांत पाटलांनी २०१९ च्या विधानसभा निववडणुकांची आठवण करून दिली आहे.

त्याचबरोबर त्यांनी म्हटलंय की, "शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन खरं-खोटं करण्याचं संभाजीराजेंचं आव्हान उद्धवजींनी स्वीकारावं. मग कुणी खंजीर खुपसला, हे जनतेला समजेल तरी. महाराजांच्या वंशजांचा मान ठेवायचा नाही, तर पक्षाच्या नावात 'शिव' वापरायचा नैतिक अधिकारही नाही! शोधा एखादं तथाकथित सेक्युलर नाव..." अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे.

दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाजपावर टीका केली आहे. सारथी संस्थेला मुंबईत भूखंड मिळवून देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्यावर चित्रा वाघ यांनी ट्वीट करत "हे सरकार लबाडाघरचं आवतान आहे" अशी टीका केली आहे.

Web Title: Chandrakant Patil On Shivsena Cm Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top