अन् चंद्रकांत पाटील म्हणाले, हे आहेत भावी पालकमंत्री

Chandrakant_Patil_h.JPG
Chandrakant_Patil_h.JPG

पुणे ः परळीच्या कार्यक्रमानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर येथील पक्षाच्या मेळाव्यात पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह अनेकांना कानपिचक्या दिल्या. त्यांनी पक्षाविरोधी कारवाया करणार्यांना पक्षविरोधी भूमिका घेतल्यास वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल असा सज्जड दमच भरला. चंद्रकांत पाटील सध्या राज्यभरात स्थानिक पातळीवरील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्याचाच भाग म्हणून सोलापुरातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ''अनेकांनी मला सांगितले परळीच्या गोपिनाथ गडावरिल कार्यक्रमाला जाऊ नका. या ठिकाणी तुमच्यावर कांदे फेकले जातील, अंडे फेकले जातील, तुम्हाला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. परंतू तरीही मी त्या ठिकाणी गेलाे. आजचे पक्षाबाबतचे चित्र जरी चांगले नसले, तरी मी त्या ठिकाणी जाऊन संवाद साधला नसता, तर अजून विचित्र समस्या निर्माण झाल्य़ा असत्या. मी जाऊन संवाद साधल्यामुळे वातावरण बदलले आहे.'' 

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांना देखील टाेला लगावला. परळीतल्या कार्यक्रमात पंकजा म्हणाल्या होत्या की, बंड हे आवश्यक असते. जो बंड करताे तोच पुढे जातो. बंड करणारेच इतिहास घडवितात, हे आपण पाहिले आहे. यावर पाटील यांनी बंड हे आपल्या लोेकांच्या विरोधात करायचे नसते असा टोला पंकजा मुंडे यांना लगावला. यावेळी पाटील यांनी महाराष्ट्राची सत्ता का गेली याच्यावर देखील भाष्य केले. ते म्हणाले, आपल्या 10 ते 15 जागा जास्त आल्या असत्या तर आपण आज सत्तेत असतो. आपण 50 जागा या आपल्यातील अंतर्गत वादामुळे गमावल्या असेही ते म्हणाले. 

शरद पवार यांच्या ईडीच्या चौकशीबाबत ते म्हणाले, ''लोकं म्हणतात की, शऱद पवार यांच्या मागे ईडीची चौकशी लावल्याने त्यांच्या मागे समाज एकवटला व त्यांचा विजय झाला, परंतू असे काही नाही. आपल्या अंतर्गत हेव्यादाव्यांमुळे आपली सत्ता गेली आहे. महाविकासआघाडीेचे हे सरकार खुप दिवस टिकणार नाही. हे सरकार जोपर्यंत राज्यात आहे, तोपर्यंत हे राज्याची वाट लावतील.'' 

कार्यक्रमाच्या सुरवातीला नावे घेताना चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांसाठी माजी मंत्री असा उल्लेख करताच सभागृहात हशा पिकला. काही दिवसासाठीचे माजी सहकार मंत्री, तसेच भावी मंत्री सुभाष देशमुख, जिल्ह्याचे काही दिवसासाठीचे माजी पालकमंत्री तसेच भावी पालकमंत्री विजयकुमार देशमुख" असा उल्लेख करत राज्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न पाटील यांनी यावेळी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com