उदयनराजेंची 'ती' इच्छाही पूर्ण करू : चंद्रकांत पाटील

उदयनराजेंची 'ती' इच्छाही पूर्ण करू : चंद्रकांत पाटील

पुणे : खासदार उदयनराजे हे स्वत: राजे असून, त्यांचा भाजप प्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हावा, अशी त्यांची इच्छा असेल तर तीही पूर्ण करू, असे वक्‍तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. 

पुण्यातील विधानभवनात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याबाबत विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश करण्यापूर्वी संबंधित आमदार किंवा खासदाराला त्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे पक्ष प्रवेशासाठी काही तांत्रिक बाबी समोर येत आहेत. लोकांच्या मनात भाजपबाबत विश्‍वास निर्माण झाला आहे. मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर भाजप सरकारसोबत राहावे लागेल, अशी अनेकांची भावना आहे. त्यामुळे भाजपात प्रवेशाची रांग लागली आहे. येत्या 1 सप्टेंबरला काही नेत्यांचे भाजपमध्ये प्रवेश होणार आहेत. त्यानंतर पाच सप्टेंबरलाही एका कार्यक्रमात पक्षात बरेच लोक प्रवेश करतील. 

नारायण राणेंचा विषय माझ्या ताकदीपलीकडचा 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यावर पाटील म्हणाले, राणेंचा विषय माझ्या ताकदीच्या पलीकडचा विषय आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याबाबत निर्णय करण्यात समर्थ आहेत. पक्षाला, राज्याला आणि शिवसेनेलाही त्याचा फायदा होईल, असा निर्णय ते घेतील. शिवसेनेच्या सहमतीनेच हा निर्णय होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com