Chandrakant Patil I शिंदेंच्या पत्रावर 34 आमदारांच्या सह्या, 4 जणांना घेवून चंद्रकांत पाटील गुवाहटीला रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil muktainagar

शिंदेंच्या पत्रावर 34 आमदारांच्या सह्या, 4 जणांना घेवून चंद्रकांत पाटील गुवाहटीला रवाना

विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण कालपासून ढवळून निघाले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आहे, शिंदे (Eknath Shinde) यांची भाजपाला पाठिंबा देऊन राज्यात पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी प्रस्ताव दिल्याचं कळतंय. दररोज शिंदेंच्या गोटा आमदारांचा भरणा वाढत आहे. एकूण ४६ आमदार पाठिशी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यातच जळगावमधून मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटीलही गुवाहाटीला रवाना झाले आहेत. पाटलांसोबत अन्य चार आमदार असल्याचं कळतंय. (Maharashtra Politics)

हेही वाचा: घडामोडींना वेग! शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवलं

महाराष्ट्रात सध्या अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे (Shivsena) ४६ बंडखोर आमदार गुवाहाटी येथे वास्तव्यास आहेत. दरम्यान, भाजपचे आमदार संजय कुटे आणि नेते मोहित कंबोज हे यापूर्वीच गुवाहाटीमध्ये बंडखोर आमदारांसोबत असल्याचं कळतंय. भाजपचे केंद्रीय मंत्रीही सेनेच्या अनेक आमदारांसोबत संपर्कात आहेत.

हेही वाचा: 'देवेंद्र फडणवीसांना CM करण्याच्या भाजपच्या स्वप्नाला सुरुंग लागेल'

या दरम्यान, आता मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आज दुपारी एका खासगी विमानाने सूरतमध्ये गेले आणि तिथून ते गुवाहाटीला रवाना झाले आहेत. गुवाहाटीमध्ये शिंदे आणि पाटील यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. यानंतर पुढील निर्णय होणार आहेत. चंद्रकांत पाटील हे गुवाहटीला रवाना झाल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. जळगावचे सेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनीही शिंदेंचा हात धरलाय.

Web Title: Chandrakant Patil Went To Guwahati With 4 Mla Of Bjp From Surat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top