मी आणि आंबेडकर आहेत तोवर 'त्यां'ना महाराष्ट्रात संधी नाही: आठवले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

"महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संघटन असून पक्ष तळागाळात पोहोचला आहे. शिवाय कार्यकर्त्यांचे जाळे घट्ट असल्याने जोवर महाराष्ट्रात मी आणि प्रकाश आंबेडकर आहोत, तोपर्यंत भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना संधी नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर आठवले माध्यमांशी बोलत होते.

कोरेगाव भीमा: "महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संघटन असून पक्ष तळागाळात पोहोचला आहे. शिवाय कार्यकर्त्यांचे जाळे घट्ट असल्याने जोवर महाराष्ट्रात मी आणि प्रकाश आंबेडकर आहोत, तोपर्यंत भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना संधी नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर आठवले माध्यमांशी बोलत होते.

आझाद हे माझे मित्रच असल्याचेही यावेळी आठवले यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, "आझाद यांच्या बाबतीत मुंबई पोलिसांनी जी भूमिका घेतली होती. ती योग्य नव्हती. कोणालाही व्यक्त होण्याचा आणि देशभर फिरण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे". आझाद हे महाराष्ट्रात राजकीय ताकद निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा असून त्यांच्या आगमनाने प्रस्थापित दलित नेत्यांना राजकीय धोका निर्माण झाल्याची चर्चा होती. त्यावर आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली.  

आनंदराज आंबेडकर यांच्याप्रमाणे आठवले यांनाही काल विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यात वाहतूक कोंडीचा फटका बसला. दुपारी साडेतीनच्या सुमारास पुण्यातील सर्किट हाऊसवरून निघालेल्या आठवले यांना विजयस्तंभाला पोहोचेपर्यंत सात वाजले होते. यावेळी पेरणे ग्रामपंचायतीच्या वतीने आठवले यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले गेले. त्यावर आठवले यांनी ग्रामस्थांच्या भूमिकेचे कौतुक करत ही आनंदाची बाब असल्याचे म्हटले.

Web Title: chandrashekar will not have opportunity in maharshtra says athwale