Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत बावनकुळे यांना उमेदवारीची अद्यापही प्रतीक्षाच!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

चंद्रकांत बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली नाही. मात्र, असे असले तरीदेखील चंद्रकांत बावनकुळे यांना अजूनही उमेदवारीची प्रतीक्षा आहे. 

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रकांत बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली नाही. मात्र, असे असले तरीदेखील चंद्रकांत बावनकुळे यांना अजूनही उमेदवारीची प्रतीक्षा आहे. 

चंद्रकांत बावनकुळे यांना उमेदवारी नाकारून त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर ज्योती बावनकुळे यांनी कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, चंद्रकांत बावनकुळे हे उमेदवारीबाबात अद्यापही प्रतीक्षेतच आहेत. 

Vidhan Sabha 2019 : खडसे म्हणतात, 'पक्षाने चांगला निर्णय घेतला'

दरम्यान, उमेदवारीची मुदत तासाभरात संपत आहे. त्यामुळे आतातरी बावनकुळे यांना उमेदवारी मिळते का हेच पाहणे महत्त्वाचे आहे. 

Vidhan Sabha 2019 : भाजप विधानसभा जिंकणार?; मोदींसह अनेक दिग्गज स्टार प्रचारक!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrashekhar Bawankule still hopeful for Vidhan Sabha Candidacy