Congress : काँग्रेसच्या कार्यकारणीतही भाकरी फिरणार! प्रियंका गांधींना मिळणार मोठी जबाबदारी

change in congress working committee priyanka gandhi congress state lok sabha poll 2024
change in congress working committee priyanka gandhi congress state lok sabha poll 2024 Team eSakal

लोकसभा निवडणूक २०२४ साठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यादरम्यान काँग्रेस पक्षाच्या वर्किंक कमिटी म्हणजेच CWC पासून ते अनेक प्रदेशाध्यक्ष बदलाचे संकेत मिळत आहेत.

यादरम्यान काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांना उत्तर प्रदेश ऐवजी दुसरी मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. २०२३ मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगना आणि छत्तीसगढ येथे विधानसभेच्या निवडणूका आणि पश्चिम बंगाल येते पंचायत निवडणूका होणार आहेत.

काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणत फेरबदल पाहायला मिळू शकतात अशी चर्चा आहे. मीडिया रिपोर्टनुसार तमिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांना लवकरच नवे प्रदेशाध्यक्ष मिळणार आहेत. यासोबतच गुजरात, ओडिसा, पद्दुचेरी, बिहार, पश्चिम बंगाल, तमिळनाडु आणि झारखंड मध्ये पक्ष प्रभारी देखील बदलले जाऊ शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये लवकरच काँग्रेस समिती स्थापन केली जाऊ शकते. राजस्थानमध्ये मु्ख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात वाद सुरू आहेत. यादरम्यान पायलट लवकरच नव्या पक्षाची घोषणा करु शकतात अशी चर्चा सुरू आहे, मात्र काँग्रेसच्या नेत्यांकडून ही शक्यता फेटाळून लावली जात आहे.

change in congress working committee priyanka gandhi congress state lok sabha poll 2024
Supriya Sule : सुप्रिया सुळेच वारसदार! अजित पवारांनी खाली पाहूनच वाजवल्या टाळ्या

मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अध्यक्ष निवडीनंतर काँग्रेस CWC मध्ये देखील बदल केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता लवकरच याबद्दल मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

पक्षात करण्यात येणारे हे बदल काही आठवड्यांत पूर्ण केले जाऊ शकतात. इकडे कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमधील विजयानंतर पक्ष प्रियंका गांधी यांना मोठी जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत प्रियंका गांधी यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी देखील असणार आहे.

change in congress working committee priyanka gandhi congress state lok sabha poll 2024
Sharad Pawar Threat : 'ती' शरद पवारांना धमकी नाहीये म्हणणाऱ्या बावनकुळेंना अजित पवारांनी सुनावलं; म्हणाले…

मध्य प्रदेश येथून प्रियंका गांधी प्रचाराला सुरूवात करु शकतात. त्या १२ जून रोजी जबलपूर येथे जाणार आहेत. सध्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या प्रभारी आहेत. पक्षाला विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

काँग्रेसला ३९९ जागांवर लढवलेल्या निवडणूकीत त्यांना फक्त दोन जागा जिंकता आल्या होत्या. इतकेच नाही तर ३८७ जागांवर डिपॉझिट जप्त झालं होतं. पक्षाच्या या पराभवानंतर प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचा दौरा केलेला नाहीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com