'सीए'च्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; 27 मे ते 12 जून दरम्यान होणार परीक्षा 

CA Exam
CA Exam

पुणे : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे 'द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटन्टस्‌ ऑफ इंडिया' (आयसीएआय) यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सनदी लेखापाल (सीए) परीक्षेच्या नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा 27 मे ते 12 जून दरम्यान होणार आहे. 

'आयसीएआय'ने यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 2 ते 17 मे दरम्यान होणार होती. मात्र आता निवडणूक प्रक्रियेचा विचार करून या वेळापत्रकात बदल केला आहे. परीक्षेच्या नव्या वेळापत्रकानुसार फाउंडेशन कोर्सची परीक्षा (नवी योजना) 4, 7, 9 आणि 11 जूनला होणार आहे. आयसीएआयमार्फत घेण्यात येणाऱ्या फाउंडेशन कोर्स परीक्षेबरोबरच इंटरमिजिएट कोर्स, फायनल कोर्स आणि इंटरनॅशनल टॅक्‍सेशन अशा परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक  www.icai.org या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com