झाकिर नाईकविरोधात ‘ईडी’चे आरोपपत्र

झाकिर नाईकविरोधात ‘ईडी’चे आरोपपत्र

मुंबई - आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी वादग्रस्त धर्मप्रचारक झाकिर नाईक विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतेच मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रानुसार त्याच्याविरोधात नोंदवलेल्या गुन्ह्याशी संबंधित १९३ कोटींच्या मालमत्तांची ओळख पटवण्यात आली असून, सुमारे ५० कोटी रुपयांच्या मालमत्तांवर टाच आणण्यात आली आहे, अशी माहिती ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी दिली. नाईकने दुबईतही गुंतवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

पैशांचा काळाबाजार केल्याप्रकरणी नाईकविरोधात २२ डिसेंबर २०१६ ला ‘ईडी’ने गुन्हा दाखल केला होता. नाईकने वादग्रस्त भाषणे देऊन समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोपही या आरोपपत्रात करण्यात आला आहे. नाईकने केलेली बहुतांश वादग्रस्त विधाने २००७ ते २०११ या कालावधीत इस्लामिक रिसर्च फाउंडेशनने भरवलेल्या शांती परिषदेत केली होती. त्यातून अनेक तरुण दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रेरित झाल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. हे या प्रकरणातील दुसरे आरोपपत्र आहे; मात्र नाईकविरोधात ‘ईडी’ने केलेल्या तपासातील पहिले आरोपपत्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com