Foreign Liquor : स्वस्त दरातील विदेशी मद्य नव वर्षापूर्वीच बाजारात!

मद्याची वाढती मागणी लक्षात घेता शासनाने आयातीत विदेशी मद्यावरील करात मोठी वाढ केली होती
liquor
liquorLiquor

नागपूर : सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना मौजमजा, आनंद लुटण्यासाठी अनेकांनी नियोजन केले आहे. यात मद्यपीदेखील मागे असणार नाहीत. त्यामुळे नव्या वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप मद्यप्राशनाने करण्याला अनेकजण पसंती देतात. त्यामुळे या काळात मद्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते. अशा मद्यप्रेमींच्या जल्लोषात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कारण, शासनाने विदेशी मद्यावरील कर कमी केल्याने (Cheap foreign liquor) स्वस्त होणार आहे. नव्या दराचे मद्य नव वर्षापूर्वीच बाजारात (In the market before the New Year) येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Cheap foreign liquor)

कोरोनामुळे शासनाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. मद्याची वाढती मागणी लक्षात घेता शासनाने आयातीत विदेशी मद्यावरील करात मोठी वाढ केली होती. स्कॉच, व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क तीनशे टक्के केले होते. आता राज्य सरकारने आयात केलेल्या स्कॉच, व्हिस्कीसह काही मद्यावरील उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात विक्री केल्या जाणाऱ्या स्कॉच, व्हिस्कीची किंमत इतर राज्यांतील किंमतीएवढी झाली आहे. दर कमी केल्याने अवैध विक्रीला आळा बसणार असून महसुलात वाढ होणार असल्याचा दावा शासनाचा आहे.

liquor
हिना खान व शाहीर शेख एकमेकांकडे मोठ्या प्रेमाने पाहतात तेव्हा...

आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला शेकडो कोटींचा महसूल मिळतो. या शुल्क कपातीमुळे सरकारचा महसुलात २०० ते २५० कोटींची भर पडण्याची अपेक्षा आहे. दर कमी करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील आयात मद्याचे दर कमी झाले आहेत. तसेच इतर राज्यांच्या बरोबरीने आणले आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने मद्याचे दर निश्चित केले असून निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे त्याची माहिती दिली आहे. कंपन्यांकडून नव्या सुधारित दरानुसार मद्य विक्री होणार आहे. नव वर्षाला होणार जल्लोष लक्षात लवकरच या नव्या दराचे मद्य बाजारत येणार असल्याची (Rates fixed by the government) शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.

liquor
तुकाराम मुंढे येणार अडचणीत; महापालिकेवर बरखास्तीची तलवार

मद्य जुने दर नवे दर

  • जॉनी वॉकर ब्लॅक लेबल

  • ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की ५,७६० ३,७५०

  • जॉनी वॉकर रेड लेबल ३,०६० १,९५०

  • जेमसन ट्रिपल डिस्टिल्ड

  • आयरिश व्हिस्की ३,८०० २,५००

  • ब्लँटायर स्कॉच व्हिस्की ३,०७५ २,१००

  • चिवास रीगल स्कॉच व्हिस्की ५,८५० ३,८५० -

  • जॉर्डन्स लंडन ड्राय जीन २,४०० १,६५०

  • जॉनी वॉकर ब्लॅक लेबल

  • ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की ५,७६० ३,७५०

  • जॉनी वॉकर रेड लेबल ३,०६० १,९५०

  • जेमसन ट्रिपल डिस्टिल्ड

  • आयरिश व्हिस्की ३,८०० २,५००

  • ब्लँटायर स्कॉच व्हिस्की ३,०७५ २,१००

  • चिवास रीगल स्कॉच व्हिस्की ५,८५० ३,८५० -

  • जॉर्डन्स लंडन ड्राय जीन २,४०० १,६५०

७ महिन्यांत रिचवली २ कोटी लिटर दारू

मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येते. यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या ७ महिन्यात २ कोटी ४ लाख लिटरच्यावर मद्याची विक्री झाली. यातून २५४ कोटी ८२ लाख ८ हजार रुपयांचा महसूल शासनाला मिळाला. यात सर्वाधिक १ कोटी ३२ लाख लिटरवर देशीचा समावेश आहे. तर ७० लाख ८० हजार लिटर विदेशी मद्याची विक्री झाली. मागील वर्षी याच काळात विक्री ही दोन कोटी लिटर पेक्षा कमी होती. तर २४८ कोटी ७० लाख ९ हजारांचा महसूल मिळाला होता. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी देशीच्या विक्रीत घट असून विदेशी मद्याची विक्री जास्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com