राज्यातील जिल्हा रुग्णालयात "केमो' मोफत सुविधा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

मुंबई - कर्करोगावरील उपचारामध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या केमोथेरपीची मोफत सुविधा आता राज्यातील जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. साधारणत: जून महिन्यापासून या योजनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. त्यात नागपूर, गडचिरोली, पुणे, अमरावती, जळगाव, नाशिक, वर्धा, सातारा, भंडारा आणि अकोला या दहा जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील महिन्यापासून जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टर आणि परिचारिका यांना मुंबईतील टाटा रुग्णालयात याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

महाराष्ट्रातील कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याबाबत राज्य सरकारतर्फे उपाययोजना केल्या जातात. उपचारासोबतच प्रतिबंधात्मक आणि जाणीव जागृतीपर मोहीम हाती घेतली जाते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संपूर्ण महिनाभर मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. दिवसेंदिवस कर्करोगाचा वाढता प्रसार पाहता त्याच्या उपचारासाठी आरोग्य विभाग आणि टाटा रुग्णालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. 

टाटा रुग्णालयातर्फे आवश्‍यकतेनुसार सुमारे सहा आठवड्यांचा केमोथेरपी उपचार रुग्णाला दिले जातात. यासाठी रुग्णाला दर आठवड्याला मुंबईत यावे लागते. त्यांना प्रवासाचा होणारा ताण, आर्थिक ताण या बाबी लक्षात घेऊन आता मोफत केमोथेरपीची सुविधा जिल्हा रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतला आहे. या सुविधेमुळे कर्करुग्णांना स्थानिक स्तरावरच उपचार घेता येणे शक्‍य होणार आहे. 

राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार... 

11 लाख  देशात वर्षभरातील कर्करुग्ण 
28 लाख  एकूण कर्करुग्ण 
पाच लाख  कर्करोगाने होणारे दरवर्षीचे मृत्यू 

Web Title: Chemo free facility in district hospital in the district