हृदय प्रत्यारोपणात आशियात चेन्नईची बाजी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

मुंबई - चेन्नईतील १५० वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रविवारी (ता. ९) झाली. आशिया खंडात सर्वांत जास्त हृदय प्रत्यारोपणात चेन्नईने बाजी मारली आहे. याचा खर्च तमिळनाडू सरकारच्या मुख्यमंत्री आरोग्य योजनेतून करण्यात आला.

तमिळनाडूतील थिरुवनमलाई येथील ३१ वर्षांच्या महिलेवर फोर्टिस मलार या रुग्णालयात ही १५० वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. तीन वर्षांचे बाळ असलेल्या या मातेला प्रसूतीनंतर हृदयाचा आजार (पोस्टपार्टम कार्डिओमायोपॅथी) झाला होता. हा आजार शेवटच्या टप्प्यात पोचला होता. तिला १ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आठवडाभरानंतर पुद्दुचेरी येथील जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या ३० वर्षांच्या तरुणाचा मेंदू मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. दिलेल्या अवयवांपैकी हृदय या महिलेला देण्याचा निर्णय ‘ट्रान्सटान’ने (ट्रान्सप्लांट ॲथॉरिटी ऑफ तमिळनाडू) घेतला. त्यानुसार पुद्दुचेरी येथून हृदय चेन्नईला आणण्यासाठी तमिळनाडू पोलिसांच्या मदतीने ‘ग्रीन कॉरिडोर’ करण्यात आला होता. ही शस्त्रक्रिया काल झाली.

Web Title: Chennai won the heart transplant in Asia