Chhagan Bhujbal on Raj Thackeray | EDची नोटीस मिळताच राज ठाकरेंनी ट्रॅक बदलला; छगन भुजबळांचा प्रहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal on Raj Thackeray, Chhagan Bhujbal News

ईडी, सीबीआय, आयकरचा केंद्र सरकार दुरुपयोग करत आहे.

ईडीची नोटीस मिळताच राज ठाकरेंनी ट्रॅक बदलला; छगन भुजबळांचा प्रहार

ईडी, सीबीआय, आयकरचा केंद्र सरकार दुरुपयोग करत आहे. जर मविआ चुकत असेल, तर जनता आम्हाला नाकारेल. त्यामुळं राजकारण करत असताना रडीचा डाव खेळू नये. तसंच ईडीचा कायदा म्हणजे राक्षसी कायदा असल्याचं स्पष्ट मत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केलंय. ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. (Chhagan Bhujbal on Raj Thackeray)

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, ईडीचा केवळ शिवसेनेलाच त्रास नाही, तर राष्ट्रवादीचे दोन मंत्रीही आतमध्ये आहेत. आम्हालाही याचा त्रास होतोय. त्यामुळं लोकशाही ज्यांच्या अंगात भिनलेली आहे, असे लोक कधीच शांत बसू शकत नाहीत. भाजपची दादागिरी आता लोकांना कळू लागलीय, असा टोला त्यांनी भाजपला लगावलाय.

हेही वाचा: पंजाब जिंकणाऱ्या 'आप'ला मोठा धक्का; 150 नेत्यांनी केला भाजपात प्रवेश

ईडीची नोटीस मिळताच राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आपला ट्रॅक बदललाय. ईडी, सीबीआय, आयकरचा केंद्र सरकार दुरुपयोग करत आहे. जर मविआ चुकत असेल, तर जनता आम्हाला नाकारेल. त्यामुळं राजकारण करत असताना रडीचा डाव खेळू नये, असा इशाराही भुजबळांनी दिलाय.

Web Title: Chhagan Bhujbal Criticizes Central Government Over Ed Cbi Income Tax

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..