बाळासाहेबांच्या अटकेवर भुजबळ म्हणाले...

वृत्तसंस्था
Monday, 14 October 2019

'बाळासाहेबांना अटक करणे ही राष्ट्रवादीची चूकच होती.' असे वक्तव्य अजित पवार यांनी केल्यानंतर त्यावर तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई : सध्या विधानसभेचे रणकंदन सुरू असतानाच अनेक नेत्यांनी त्यांना माहीत असलेली गुपितं, रहस्य उलगडायला सुरवात केली आहे. अशाच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका प्रचारसभेतही अजित पवार व छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेबाबत विधान केले आहे. 'बाळासाहेबांना अटक करणे ही राष्ट्रवादीची चूकच होती.' असे वक्तव्य अजित पवार यांनी केल्यानंतर त्यावर तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

ajit pawar

'बाळासाहेबांना अटक करणं ही आमची चूक होती. फक्त काही वरिष्ठांच्या हट्टापायी आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला. त्यांच्या अटकेवर चर्चा केली असता, त्यावेळच्या विभागप्रमुखांनी हा आमचा निर्णय आहे, त्यामुळशे आम्हाला जे योग्य वाटते तेच आम्ही करणार असे सांगितले.' असे अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मात्र, हे सांगताना त्यांनी ते विभागप्रमुख किंवा मंत्री कोण होते हे सांगण्याचे टाळले. पण, बाळासाहेबांना अटक केली त्यावेळी छगन भुजबळ गृहमंत्री होते. 

balasaheb thackeray

यावर स्पष्टीकरण देताना भुजबळांनी सांगितले की, 'श्रीकृष्ण आयोगाने ज्या लोकांना दोषी ठरविले त्यांच्यावर योग्य कारवाई असं सांगण्यात आलं होतं. युती सरकारच्या वेळी बाळासाहेब ठाकरे व शिवसैनिकांविरूद्धच्या खटल्यांचा निकाल लागला. पण श्रीकृष्ण आयोगाची फाईल तशीच होती. मी गृहमंत्री असताना माझ्यासमोर ती फाईल आली व मी कचाट्यात सापडलो आणि नाईलाजाने मला या फाईलवर सही करावी लागली.' असे भुजबळांनी एका मुलाखतीत सांगितले. 

chhagan bhujbal


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan Bhujbal explains about Balasaheb Thackeray s arrest