Maratha Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिल्याने आनंदित : भुजबळ

टीम ई-सकाळ
गुरुवार, 27 जून 2019

- ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिल्याने आनंदित

मुंबई : मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटात आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ''ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जावे ही भावना होती. ती मान्य केली गेली. त्यामुळे मी आनंद व्यक्त करतो''. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयाने आज निकाल दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असून, राज्य सरकारही समाधानी आहे. वंचित घटकाला आवश्‍यकता असल्यास राज्य सरकार स्वतःच्या विशेषाधिकारामध्ये आरक्षण देऊ शकते, असा निर्वाळाही न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे आर्थिक-सामाजिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) या घटकालाही मान्यता मिळाली आहे. 

या निकालानंतर भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला. यामध्ये त्यांनी सांगितले, की ओबीसी समाजाला आरक्षण दिले जावे ही भावना होती. ती मान्य केली. त्यामुळे आनंदित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan Bhujbal Happy on Maratha Reservation Decision given by Court